जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट करून हत्या करणं हे थांबताना दिसत नाही. पुलवामात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली. संजय शर्मा असं या काश्मिरी पंडिताचं नाव होतं तो बँक कर्मचारी होता. पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसंच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. तसंच काश्मिरी पंडितांच्या हत्या कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ वाजण्याच्या सुमारा एका माणसाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. संजय शर्मा असं त्यांचं नाव होतं. ते बँकेत काम करत होते आणि त्यांचं वय ४० होतं. दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये अल्पसंख्याक असलेल्या काशीनाथ शर्मा यांचा मुलगा संजय शर्मावर गोळी झाडली आणि त्याला ठार केलं. ही घटना घडली तेव्हा संजय शर्मा हे बाजारात चालले होते.

Cm Himanta Biswa Sarma On Congress Manifesto
“हा तर पाकिस्तानच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा”, हिमंता बिस्वा सरमांची खोचक टीका, म्हणाले…
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
Arvind Kejriwal ED custody
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का, न्यायालयाने ‘या’ तारखेपर्यंत वाढवली ईडी कोठडी
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना

मेहबुबा मुफ्ती यांनी काय म्हटलं आहे?

गोळी लागलेल्या अवस्थेत पोलीस त्यांना रूग्णालयात घेऊन चालले होते. मात्र वाटेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर या ठिकाणी सशस्त्र जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमध्ये या हत्यांच्या घटना थांबताना दिसतच नाहीत. भारत सरकार जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या बाबतीत सातत्याने अपयशी ठरतं आहे. संजय शर्मा यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत या आशयाचं ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात काश्मिरी पंडीत पुरण किशन भट या काश्मिरी पंडिताची संशयित दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पुरण किशन भट हा शोपियाँमधल्या गुंड गावातला होता. त्याची हत्या करण्यात आली होती. आता आज पुन्हा एकदा संजय शर्मा या काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे.