एआयएमआयएम अर्थात ऑल इडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंगळवारी तेलंगणातील संगारेड्डी भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपाचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला खुलं आव्हानही दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भाषणात ओवेसींनी बांदी संजय यांनी केलेल्या एका विधानाचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले होते बांदी संजय?
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, २०२०मध्ये बांदी संजय यांनी भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी मतदारांच्या मदतीने हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. “या निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि रोहिंग्या मतदारांशिवाय व्हायला हव्यात. आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर जुन्या शहरात आम्हा सर्जिकल स्ट्राईक करू”, असं बांदी संजय म्हणाले होते.
“काय बापाची जहागीर आहे का?” ओवेसींचा सवाल
दरम्यान, असदुद्दीन ओवेसी
“तुमच्यात हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा. बोल मोदींना की चीनला डेबसांग आणि डेमचांगवरून हाकलून लावा. २ हजार किलोमीटरचा भाग चीननं बळकावलाय. पण तिथे काही करत नाही, म्हणे आम्ही जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार”, असं आव्हान ओवेसींनी दिलं आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.