कल्याण : सर्वाधिक वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पूल लवकर बांधून पूर्ण व्हावा म्हणून प्रवासी मागील पाच वर्षापासून शासनाकडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्याकडे मागणी करत आहेत. परंतु, पलावा चौकातील एका वजनदार राजकीय व्यक्तीचे बेकायदा बांधकाम या पुलामुळे बाधित होत असल्याने ते बांधकाम वाचविण्यासाठी शासन पूल रखडला तरी चालेल, या भूमिकेतून अतिशय संथगतीने पलावा चौकातील पुलाचे बांधकाम करत आहे, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी बुधवारी एक्सव्दारे (ट्वीटर) केली आहे.

शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक हा दररोजच्या वाहतुक कोंडीचे मोठे ठिकाण आहे. या चौकापासून हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रमोद पाटील राहतात. याशिवाय एक लाखाहून अधिकचे लोक पलावा परिसरात राहतात. हजारो वाहने दररोज या रस्त्यावरून धावतात. या सर्वांना पलावा चौकातून कल्याण किंवा ठाणे, मुंबईकडे जावे लागते.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Maharashtra News in Marathi
Maharashtra News : नाना पटोलेंच्या अपघातामागे संजय राऊतांचा हात? संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, म्हणाले…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा…मुरबाड मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांच्या

पलावा चौकातील महत्वपूर्ण पूल मार्गी लागावा म्हणून आमदार पाटील यांनी वेळोवेळी एमएमआरडीएकडे तगादा लावला. परंतु, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार पाटील यांच्यात यापूर्वी षडाष्टक असल्याने या पुलाचे काम तत्परतेने पूर्ण झाले तर त्याचे श्रेय आमदार राजू पाटील यांना मिळेल या विचारातून खासदार शिंदे यांनी वेळोवेळी या पुलाच्या कामात अडथळे आणले. त्यामुळे हे महत्वपूर्ण काम रखडले, असे पाटील समर्थक सांगतात.मागील अडीच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री पिता पुत्राने विशेषता खासदार शिंदे यांनी आमदार राजू पाटील यांची कोंडी केल्याची चर्चा आहे.

दहावे आश्चर्य

मुंबईत दादर येथे टिळक पुलाचे काम करताना बांधकाम अधिकाऱ्यांनी पुलाचा एक सांधा जोड या भागातील एका जुन्या घराच्या खांबाला आणून जोडला आहे. अशाप्रकारे काम करून अधिकाऱ्यांनी जगातील नववे आश्चर्य मुंबईत निर्माण केले आहे. हाच धागा पकडून आमदार राजू पाटील यांनी पलावा चौकात मग दहावे आश्चर्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविले आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा…डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

पलावा चौकातील एका बेकायदा बांधकाम ( या बांधकामात दारुचे दुकान, स्वीट मार्ट) वाचविण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिळफाटा रस्त्याचे पलावा चौक भागातील आरेखन बदलले. या आरेखनानुसार पुला लगतचे बेकायदा बांधकाम संरक्षित झाले. या पुलाच्या खांबाचा एक सांधा रस्त्या लगतच्या बेकायदा बांधकामाला खेटला आहे. भविष्यात पुलावर काही अपघात घडला तर ते वाहन थेट संबंधित बांधकामाच्या गच्चीवर जाऊन पडेल, अशी भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांची ही दूरगामी करामत पाहण्यासाठी नागरिकांनी, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवर्जून पलावा चौकाला भेट द्यावी आणि जगातील बांधकामाचे दहावे आश्चर्य पाहिल्याचे समाधान मानावे असे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. पूल पूर्ण झाला तर भागातील वाहन कोंडी कायमची संपुष्टात येणार आहे.