भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालं आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत आहेत. परिणामी आरोग्यंत्रणा कोलमडत आहेत. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिविर व लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून भारत सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्याचे दिसत आहे.

रेल्वे मंत्रालयाने ६४ हजार बेडसह जवळपास ४ हजार कोविड केअर कोच राज्यांना वापरासाठी तयार केले आहेत. सध्या १६९ कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले आहेत. अशा माहिती देण्यात आली आहे.

राज्यांच्या मागणीनुसार रेल्वेने नागपूर, भोपाळ, इंदौर जवळील तिहीसाठी कोविड केअर कोच तयार केले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि नागपूर महापालिका आयुक्त यांच्यात ११ कोविड केअर कोचसाठी सामंजस्य करार झाला आहे. अशी देखील माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीस रेल्वे विभागाकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे करोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. राज्य सरकारने जर या कोविड केअर कोचची मागणी केली, तर ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती या अगोदर देण्यात आली होती.

रेल्वेकडे ४००० डब्बे करोना रुग्णांसाठी सज्ज; सरकारनं मागितले तर पुरवणार

कोविड केअर कोचमध्ये रेल्वेकडून रूग्णांच्या सुविधेसाठी अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कुलर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा यामध्ये समावेश आहे.

करोना विरोधातील लढाईत रेल्वेचा पुढाकार; मागणीनुसार आयसोलेशन कोच उपलब्ध करणार

पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच उपलब्ध असून, त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली होती.