मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची देशभरात चर्चा होताना दिसत आहे. व्हिडिओ आणि जाहिरातींमधील सामान्य लोकांना थेट आपल्या मंचावर आणत राज ठाकरे मागील दोन आठवड्यांपासून भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमित शाह यांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल करताना दिसत आहेत. राज यांच्या सभांची लोकप्रियता केवळ राज्यातच नाही तर परराज्यातही दिसून येत आहे. म्हणूनच कर्नाटकमधील एका नेत्याने राज ठाकरे यांनी चिकोडी येथील मतदार संघातील उमेदवारासाठी निपाणीमध्ये सभा घ्यावी असे पत्रच राज ठाकरेंना पाठवल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार गणेश हुक्केरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून कर्नाटकमध्ये सभा घेण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी निपाणी येथे एक सभा घ्यावी असं हुक्केरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील नेत्याने राज ठाकरेंना पाठवलेले पत्र मराठीमध्ये लिहिलेले आहे. हुक्केरी यांचे वडील प्रकाश हुक्केरी चिकोडी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. आपल्या वडीलांच्या प्रचारासाठी राज यांनी निपाणीत सभा घ्यावी असं या पत्रात गणेश यांनी म्हटले आहे.

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पंजाब कब जिता है? शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात

१६ एप्रिल रोजी राज ठाकरे यांना उद्देशूनच हे पत्र लिहिले असून या पत्राचा विषय ‘लोकसभा निवडणूक २०१९ निमित्त आपली निपाणी येथे सभा घेणेबाबत’ असा आहे. या पत्रात हुक्केरी म्हणतात, ‘मी आमदार गणेश प्रकाश हुक्केरी (मुख्य प्रतोद कर्नाटक राज्य सरकार) आपणास नम्र विनंती करु इच्छितो की माझे पिताजी माननीय खासदार प्रकाश हुक्केरी हे या येत्या लोकसभा निवडणुकीसाठी चिकोडी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. आठ विधानसभा मतदारसंघापैकी निपाणी हा मतदारसंघ महाराष्ट्राशी संलग्न असून येथील बहुसंख्य जनता ही मराठी भाषिक आहे. मी आपणास नम्र विनंती करु इच्छितो की आपला बहूमूल्य वेळ काढून आपण आपली एक सभा आम्हाला निपाणी येथे द्यावी व आमच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा.’

हे पत्र मनसेला मिळाले असून यासंदर्भात अद्याप कोणता निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहे. चिक्कोडी आणि मुंबईमध्ये एकाच दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान असल्याने राज यांची कर्नाटकात सभा घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे. राज यांना याआधीही उत्तर प्रदेशमध्येही राज ठाकरे यांनी सभा घ्यावी अशी मागणी तेथील नेत्याने केली होती.