Narendra Modi in ISRO : चांद्रयान ३ मोहिमेत सहभागी झालेल्या महिला शास्त्रज्ञांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी नारीशक्तीचा उल्लेख करत शास्त्रज्ञांनी केलेल्या असामान्य कामगिरीचा सन्मान केला.
चांद्रयान ३ मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट रोजी यानाचे चंद्रावर लँडिंग झाले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेला गेले होते. त्यांनी तेथूनच हा उपक्रम दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पाहिला. त्यामुळे भारतात येताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांची बंगळुरूत येऊन भेट घेतली. तसंच, त्यांना संबोधितही केलं. यावेळी त्यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना मिठी मारली. तर, महिला वैज्ञानिकांचंही विशेष कौतुक केलं.
हेही वाचा >> पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, चांद्रयान ३ उतरलं त्या जागेचं नामकरण; आता ‘या’ नावाने ओळखला जाणार लँडिंग स्पॉट!
उपस्थित वैज्ञानिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे.”
“निर्माणापासून प्रलयापर्यंत सृष्टीचा आधार नारी शक्तीच आहे. आपण सर्वांनी पाहिलं की चांद्रयान ३ मध्ये देशने आपल्या महिला वैज्ञानिकांनी देशाच्या नारी शक्तीने किती मोठी भूमिका पार पाडली आहे, असंही मोदी म्हणाले.
हेही वाचा >> चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानिमित्त २३ ऑगस्टला साजरा करणार खास दिन, मोदींकडून ‘या’ दिनाची घोषणा
चंद्रावर पोहोचलेल्या ठिकाणांचं नामकरण
“स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँईंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चांद्रयान उतरलं आहे, भारताने त्या जागेच्या नामकरणाचा निर्णय घेतला आहे. ज्या जागेवर चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं आहे, त्या पाँईटला शिवशक्तीच्या नावाने ओळखलं जाईल”, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
“आणखी एक नामकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी चांद्रयान २ चंद्रापर्यंत पोहोचलं होतं, तेव्हा प्रस्ताव होता की त्या जागेचं नाव ठरवलं जाईल, पण त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की जेव्हा चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचेल तेव्हा आम्ही दोन्ही पाँईंटचं नाव एकत्र ठेवू. आज मला वाटतं की जेव्हा हरघर तिरंगा, हर मन तिरंगा आणि चंद्रावरही तिरंगा आहे, तर तिरंगाशिवाय चांद्रयान २ शी संबंधित त्या जागेला दुसरं काय नाव देता येऊ शकतं? त्यामुळे चांद्रयान २ ने जिथे आपली पावलं ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे”, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा >> Chandrayan 3 : चांद्रमोहिमेच्या यशामागचे मराठमोळे हात, नांदेडच्या संशोधिकेचं ‘विक्रम’च्या लँडिंगमध्ये मोठं योगदान
शिवशक्ती नावाच अर्थ काय?
“शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे”, असं मोदी म्हणाले.
“ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे”, असंही मोदी म्हणाले.
हेही वाचा >> ‘चांद्रयान-३’मागची रॉकेट वूमन- रितू करिधाल-श्रीवास्तव
प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहतंय
“भारताची युवा पिढी तंत्रज्ञान, विज्ञानाने भारलेली आहे. त्यामागे आपल्या अशाच स्पेस मिशनचं यश आहे. मंगलायानचे यश, चांद्रयान मोहिमेचे यश, गगनयानामुळे देशाच्या युवा पिढीला नवा उत्साह मिळाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज चांद्रयानाचे नाव आहे. भारतातील प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकांमध्ये आपलं भविष्य पाहत आहे. त्यामुळे तुम्ही (वैज्ञानिकांनी) फक्त चंद्रावर तिरंगा फडकवला नसून तुम्ही एक मोठं यश प्राप्त केलं आहे, ज्यामुळे भारताची संपूर्ण पिढी जागृत झाली आहे, त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. तुम्ही पूर्ण पिढीवर आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे”, असं मोदी म्हणाले. “आज तुम्ही भारतीय मुलांमध्ये आकांक्षाचे बिज रोवले आहे, ते उद्या वटवृक्ष बनणार आहे”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.