देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ४२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. या महिन्यात करोनाबाधितांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. २ जून रोजीही देशात ४०४१ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

शनिवारी, १५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची झाली आहे तर २६१२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच सध्या २२ हजार ६९१ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ४.३१ कोटी लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४.२६ कोटी लोक बरे झाले असून ५.२४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

केरळमध्ये प्रत्येक १०० चाचण्यांमागे १० करोनाबाधित रुग्ण
केरळमध्ये करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. शनिवारी केरळमध्ये १४५६ नव्याने करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या केरळमध्ये ७४२७ करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. प्रत्येक १०० चाचण्यांमागे १० करोनाबाधित आढळून येत आहे. परिणामी केरळचा करोनाबाधिताचा दर ९.८७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
देशात कोरोना रुग्णांच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढला आहे. राज्यात शनिवारी १३५७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५९५ रुग्ण बरे झाले असून एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या ५८८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

दिल्लीत करोना नियंत्रणात
दिल्लीत शनिवारी कोरोनाचे ४०५ रुग्ण आढळले. सुदैवाने या महामारीमुळे मृत्यू झाला नाही. दिल्लीत सध्या १४६७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात दिल्लीत दीड हजारांहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर २६ हजार २१२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानीत करोनाचा दर २.०७ टक्के आहे.

कोर्बेव्हॅक्स बूस्टर डोस मंजूर
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने CORBEVAX लसीला कोरोना बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली आहे. १८ वर्षांवरील लोक ज्यांनी कोव्हिशिल्ड (CovaShield ) किंवा कोवॅक्सिन (Covaxin) चे दोन्ही डोस घेतले आहेत ते आता आपत्कालीन परिस्थितीत बूस्टर डोस म्हणून कोर्बेव्हॅक्स( CORBEVAX) घेऊ शकतात.