मलिंगा ठरला हिरो; शेवटच्या चेंडूवर मुंबईचा IPL विजेतेपदाचा चौकार
IPL 2019 Final MI vs CSK Live Updates : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली. वाचा सविस्तर…
कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेस अनुकूल स्थिती!
राज्यात भाजप सरकार स्थापन करण्यास अनुकूल वातावरण आहे, असे सूचक वक्तव्य कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष सरकारच्या स्थिरतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर…
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अन्नधान्य भाववाढीचा धोका
निवडणुकीच्या धामधुमीत एका महत्त्वाच्या घटकाकडे बहुतेकांचे लक्ष गेलेले नाही. हा घटक आहे अन्नधान्य भाववाढीचा. नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच पश्चिम आणि दक्षिण भारतातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि असाधारण उष्म्यामुळे शेतमालाच्या किमती वाढलेल्या आहेत. या वाढीव किमतींचे नियंत्रण हे नव्या सरकारसमोरील पहिले मोठे आव्हान राहील. वाचा सविस्तर…
सहाव्या टप्प्यात ६३ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात ५९ जागांसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले, तर पश्चिम बंगालमध्ये आठ जागांसाठी ८० टक्क्य़ांवर मतदान झाले, तसेच तेथे भाजप उमेदवारावर हल्ला करण्यात आला. वाचा सविस्तर…
‘बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीला या कारणामुळे आला होता काजोलचा राग
‘सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन’वरील ‘सुपर डान्सर 3’ हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय, दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. या आठवड्यात गायक कुमार सानू यांनी हजेरी लावली. वाचा सविस्तर…