उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा पीडितेच्या आईने गुप्तांग कापल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी आणि पीडितेची आई एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. हरिशंकर असे त्या आरोपी प्रियकराचे नाव असून घटनेनंतर त्याला लखनऊच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन हरिशंकरविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा– Bilkis Bano Case: ‘दोषी ब्राह्मण असून चांगले संस्कार’ म्हणणाऱ्या भाजपा आमदारावर ओवेसी संतापले; म्हणाले “नशीब गोडसेला…”

प्रियकराला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, हरिशंकर आणि पीडितेची आई एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात. एक दिवस जेव्हा महिला घरी पोहचली तेव्हा हरिशंकर तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. प्रेयसीने म्हणजेच पीडितेच्या आईने याला विरोध केला. मात्र, हरिशंकरने तिच्यावरही हल्ला केला. अखेर हरिशंकर ऐकत नसल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचे गुप्तांग कापल्याचे पीडितेच्या आईने म्हणले आहे.

हेही वाचा- २५ दिवसांत ८ रुग्णालयं, १३००० किमीचा प्रवास; ९ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी लढा

आरोपीवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीसीच्या कलम ३७६ बलात्कार आणि पॉक्सो कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीवर लखनऊच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती लखीमपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी दिली.