भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी २०१९ विश्वचषक स्पर्धेत, न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात अनोख्या विक्रमाचा मानकरी ठरला आहे. महेंद्रसिंह धोनीचा भारताकडून हा ३५० वा सामना ठरला आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा धोनी दुसरा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करुन धोनीने सचिन तेंडुलकर व अन्य दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : बुमराहचा मारा ठरतोय प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी

सचिन तेंडुलकरने आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजेच ४६३ वेळा भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यानंतर या यादीमध्ये महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा यांचा नंबर लागतो. या तिन्ही खेळाडूंनी श्रीलंकेसाठी अनुक्रमे ४४८, ४४५ आणि ४०४ सामने खेळले आहेत. याशिवाय शाहीद आफ्रिदी, रिकी पाँटींग, इंझमाम उल-हक, वासिम अक्रम हे खेळाडूदेखील यादीमध्ये धोनीच्या पुढे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – World Cup 2019 : नकोशा विक्रमात न्यूझीलंडने भारताला टाकलं मागे