scorecardresearch

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, राज्यसभा खासदार म्हणून ‘या’ तारखेला संपणार कार्यकाळ

आरसीपी सिंग यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला आहे.

Mukhtar Abbas Naqvi Resign as Union ministers
संग्रहित

Mukhtar Abbas Naqvi Resign : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यसभा खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ गुरुवारी ( ७ जुलै ) संपत आहे. मुख्तार अब्बास नक्वी हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक मंत्री होते.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपातर्फे उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असण्याची शक्यता आहे. नकवी यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ उद्या संपणार आहे.

आज सकाळी नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. नक्वी आणि राजनाथ सिंह हे पंतप्रधान मोदींच्या सरकारमधील दोनच मंत्री आहेत, जे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्येही होते. निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर भाजप डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उपराष्ट्रपती पदी अल्पसंख्याक चेहरा देण्याची शक्यता आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री आरसीपी सिंग यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukhtar abbas naqvi resign as union ministers spb

ताज्या बातम्या