पीटीआय, नवी दिल्ली

‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ (आरआरटीपी) या योजनेंतर्गत नव्या रेल्वे गाडय़ांचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे. या गाडय़ांचा पहिला ताफा दिल्ली-मेरठ मार्गावर शनिवार, २१ ऑक्टोबरपासून धावणार असून त्याचे उद्घाटन आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

स्थानिक दळणवळण अधिक जलद आणि आरामदायी करण्यासाठी आरआरटीपी योजना सुरू करण्यात आली होती. याचा पहिला टप्पा म्हणून १७ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-गाझियाबाद-मेरठ मार्गाचे भूमिपूजन ८ मार्च २०१९ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या मार्गावरील साहिदाबाद-दुहाई डेपो या स्थानकांदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करतील. या मार्गावर गाझियाबाद, गुलधर, दुहाई ही स्थानके आहेत. आरआरटीपी या ताशी १८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या मध्यम-जलदगती रेल्वे आहेत. आरआरटीपी योजनेत पाच ते १५ मिनिटांना एक गाडी सोडण्यात येणार असून राष्ट्रीय राजधानी परिसरात असे आठ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यातील दिल्ली-मेरठ, दिल्ली-अलवर आणि दिल्ली-पानिपत या मार्गाना प्राधान्य देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“काँग्रेस सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू”, निवडणुकीआधी राहुल गांधींचं जनतेला आश्वासन

आत्ममग्नतेला सीमा नाही – काँग्रेस</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरआरटीपी योजनेतील रेल्वे गाडय़ांना ‘नमो भारत’ नाव देण्यावरून काँग्रेसने टीका केली आहे. ‘नमो स्टेडियमनंतर आता नमो ट्रेन. त्यांच्या आत्ममग्नतेला कोणतीही सीमा नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर दिली. तर ‘भारत कशाला? फक्त देशाचे नाव नमो करून टाका, म्हणजे काम होईल,’ असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी लगावला.