सामाजिक विषयांवर वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडणारे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे. आंध्र प्रदेशमधील विझियानगरम जिल्ह्यातील राजम भागात असणाऱ्या जीएमआर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील परिस्थिती आणि सिंगापूरमधील परिस्थितीची तुलना करताना कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढे येऊन नेतृत्व स्वीकारण्याचं आवाहनही केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले नारायण मूर्ती?

नारायण मूर्तींनी यावेळी बोलताना भारत आणि सिंगापूरमधील वास्तवातला फरत सांगितला. “आपण सगळ्यांनीच कोणत्याही कमतरतेकडे बदलाची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वत नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे”, असं नारायण मूर्ती यावेळी म्हणाले.

भारत आणि सिंगापूरमधील वास्तव!

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण मूर्ती यांनी भारत आणि सिंगापूरमधील वास्तवाविषयी भाष्य केलं. “भारतात वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, घाणेरडे रस्ते, प्रदूषण आणि बहुतेक वेळा सत्तेचा अभाव असं चित्र असतं. पण सिंगापूरमध्ये वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, स्वच्छ पर्यावरण आणि लोकांकडे असणारी सत्ता”, असं ते म्हणाले. “तरुणांनी समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता घडवायला हवी. आपल्या स्वत:च्या हिताच्याही आधी लोकांचं, समाजाचं आणि देशाचं हित ठेवायला हवं”, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

नारायण मूर्तींनी मान्य केली चूक!

दरम्यान, एन. नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केली आहे. इन्फोसिसचे अध्यक्ष म्हणून केलेल्या त्या चुकीचा आपल्याला सर्वाधिक पश्चात्ताप होतो, असंही ते म्हणाले. “संस्थापकांच्या मुलांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ नये, अशी भूमिका मांडणं ही माझी चूक होती. संस्थापकांच्या पुढच्या पिढीला इन्फोसिसमधून बाहेर ठेवणं ही चूक होती”, असं मूर्ती यांनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana murthy on corruption in india pollution issue gmr institute of technology pmw
First published on: 20-12-2022 at 10:12 IST