नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील. नरेंद्र मोदी यांनी आपल्या १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. तसं पहायला गेल्यास यामध्ये काही नवीन नाही, कारण गेल्या तीन वर्षांपासून नरेंद्र मोदी लोकांकडून सूचना मागवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे की, ‘१५ ऑगस्टला होणाऱ्या भाषणाबद्दल तुमचं काय म्हणणं आणि सूचना आहेत ? तुम्ही नरेंद्र मोदी अॅपवरुन कल्पना शेअर करु शकता’

येणाऱ्या आगामी दिवसांत लोकांकडून उपयुक्त माहिती मिळेल अशी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी गेल्या तीन वर्षांपासून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी लोकांकडून थेट सूचना मागवत आहेत. लोकांना नरेंद्र मोदी अॅपशिवाय mygov.in या संकेतस्थळावरही सूचना देता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्य दिनाचं हे पाचवं भाषण असणार आहे.

नरेंद्र मोदींनी कोणत्या विषयावर भाष्य केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतीक्रिया कळवा