Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सिंगापूरमध्ये असलेल्या भारतीय मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उत्साहाने तयारी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) ढोलवादन केलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिंगापूर विमानतळावर स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचं सिंगापूरच्या विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. सिंगापूरमध्ये असलेले भारताचे उच्चायुक्त यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ( Narendra Modi ) स्वागत केलं. त्यानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॉटेलवर आले तेव्हा तिथे त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत झालं. त्यावेळचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढोलवादन करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

ब्रुनेई दारुसलामला पंतप्रधान मोदींची ऐतिहासिक भेट; ब्रुनेई आणि भारताचे संबंध कसे आहेत?

सिंगापूरच्या दौऱ्यादरम्यान काय होणार?

सिंगापूरच्या या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स यांच्यात चर्चा होणार आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या धोरणात्मक भागिदारीवर ही चर्चा होईलल. दोन्ही नेते त्यांची धोरणं काय आहेत ते स्पष्ट करतील. तसंच जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होईल. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांच्याशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) चर्चा करणार आहेत. तसंच सिंगापूरमधल्या प्रमुख व्यावसायिकांचीही भेट त्यांच्या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेंद्र मोदी सिंगापूरपूर्वी ब्रुनेई दौऱ्यावर

सिंगापूरला भेट देण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनेईच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी बंदर सेरी बागवान येथे जाऊन सुलतान हाजी हसनल बोलकियाह यांच्याशी चर्चा केली. भारत आणि ब्रुनेई यांच्यातले संबंध कसे दृढ करता येतील याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की महाराज सुलतान हाजी हसनल बोलकियाह यांना भेटून मला आनंद झाला. ब्रुनेन आणि भारत यांच्यातले संबंध दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली आहे ही आनंदाची बाब आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. असं सगळं असलं तरीही सिंगापूर दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ढोलवादन केलं. या ढोलवादनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.