मंगळावरील शेतीसाठी नासाकडून प्रयोग

वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड

विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड

मंगळावर बगिचा उभारण्यासाठी त्याचे सादृश्यीकरण प्रयोग नासाचे वैज्ञानिक करीत असून आगामी मंगळ मोहिमातील अवकाशवीर तिथे कुठल्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड  करू शकतील याचा अंदाज घेण्यात येत आहे.

मंगळावरील मानवी स्वारीत तेथे पुरेशा अन्नाची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान आहे. मंगळ बगिचाचे सादृश्यीकरण नासाच्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिटय़ूट यांनी केले आहे. त्यात मंगळावर वनस्पतींची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे.

मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे. मंगळावरील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत, त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे नासाचे म्हणणे आहे.

नासाच्या केनेडी स्पेस सेंटरचे व्हेजिटेबल प्रॉडक्शन सिस्टीम प्रयोगाचे प्रकल्प व्यवस्थापक ट्रेन्ट स्मिथ यांनी सांगितले की, विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते. यात अवकाशवीर हे अवकाशात विविध वनस्पतींची लागवड करू शकतील. त्याचे प्रयोग आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात करता येतील, असे स्पेस डॉट कॉमने संशोधनाबाबत माहिती देताना म्हटले आहे.

अंकुरण दर कमी

मंगळ बगिच्याच्या सादृश्यीकरणात हवाई बेटावरील  माती वापरण्यात आली, कारण ती मंगळासारखी आहे. यात नेमकी किती माती वापरावी लागेल, कोणती पोषके समाविष्ट करावी लागतील याचा अंदाज घेण्यात आला. लेटय़ूसची लागवड कुठल्याही पोषकांचे मिश्रण न करता होऊ शकते असे दिसून आले आहे, पण या मातीत लेटय़ूसची मुळे कमकुवत ठरली व अंकुरण दर कमी दिसून आला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nasa farming in mars

ताज्या बातम्या