सहकाराच्या मुद्दय़ावर पवार-शहा भेट

काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली.

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली. शहा यांनी केंद्रीय सहकार मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पवारांनी घेतलेली ही पहिलीच भेट असून सहकारी साखर कारखान्यांच्या समस्यांवर चर्चा झाल्याचे ट्वीट पवार यांनी बैठकीनंतर केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे हेही सोबत होते. उसाचा हमीभाव, साखरेचे दर आणि अतिरिक्त उत्पादन, इथेनॉल उत्पादन आदी मुद्दय़ांकडे शहा यांचे लक्ष वेधण्यात आले. ‘’एनडीआरएफ’’ चा बेस कॅम्प महाडमध्ये व्हावा अशी मागणी तटकरे यांनी केली.

दोन आठवडय़ांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात पवारांच्या गाठीभेटींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp chief sharad pawar meets amit shah discusses issues faced by sugar co operative sector zws