जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. “उत्तर प्रदेश हे नवं (दुसरं) जम्मू -काश्मीर आहे”, असं ट्विट जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केलं. मात्र, आता त्यांच्या या ट्विटवर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका युझरने लिहिलं आहे की, “आंदोलक शेतकरी दहशतवाद्यांसारखे वागत आहेत? असं तुम्हाला वाटतंय का?”

उत्तर प्रदेश नवं जम्मू आणि काश्मीर झाल्याची टीका करणाऱ्या ओमर अब्दुल्ला यांना सोशल मीडियावर अनेक प्रश्न केले जात आहेत. “नाही सर, इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही”, अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने ओमर अब्दुल्ला यांच्या या ट्विटवर दिली आहे. तर काहींनी आपण ओमर अब्दुल्ला यांच्याशी सहमत असल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून लखीमपूर घटनेविषयी संताप व्यक्त केला.

लखीमपूर खेरी : “उत्तर प्रदेश नवं जम्मू आणि काश्मीर;” ओमर अब्दुल्ला यांची टीका

निष्पक्ष चौकशीचं आश्वासन

आयजी (लखनऊ) लक्ष्मी सिंह यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यावर सहमती झाली आहे. त्यांचं शवविच्छेदन डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे व्हिडीओग्राफीसह केलं जाईल. त्याचप्रमाणे, ज्या शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना ४० लाख रुपये आणि ५ लाख रुपयांच्या विमाही काढून देण्यात येतील. त्याचसोबत, आम्ही त्यांना निष्पक्ष चौकशीचं आश्वासन दिलं आहे”, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं?

मीडिया अहवालानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी (३ ऑक्टोबर ) तेनी गावात बनवीरमध्ये डेप्युटी सीएम केशव प्रसाद यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावाच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. यावेळी, शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले. तर याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.