आपल्या आकाशगंगेच्या टोकाच्या बाजूला नवजात ताऱ्यांचे आगमन झाले आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा या संशोधनानुसार दुसऱ्या एका दीर्घिकेतील उष्ण वायू आपल्या आकाशगंगेवर आदळत आहेत, त्यामुळे नवीन ताऱ्यांचा जन्म आकाशगंगेत होत आहे.
खगोलवैज्ञानिकांना मॅगलानिक ढगांकडून आलेले वायूचे प्रवाह प्रथमच दिसून आले आहेत. आपल्या आकाशगंगेच्या जवळच मॅगलानिक ढग आहेत. सदर्न कनेक्टीकट स्टेट युनिव्हर्सिटिच्या डॅना कॅसेटी-डायनेस्क्यू यांनी हे संशोधन केले असून त्यांच्या मते मॅगलानिक ढग व आपली आकाशगंगा यांच्यात अशा प्रकारची आंतरक्रिया घडत आहे. तेथील वायू आपल्या आकाशगंगेवर आदळत आहेत पण अशा क्रियेचे निरीक्षण करणे खूप अवघड असते. मॅगलानिक ढगातही क्रियाशील ताऱ्यांची निर्मिती होत असते.
ताऱ्यांचे निरीक्षण जे नेहमी करतात त्यांना नुसत्या डोळ्यांनीही मॅगलानिक ढगाचे दर्शन होते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते आपल्या आकाशगंगेची उपदीíघका असलेल्या मॅगलानिक ढगांच्या उष्ण वायू प्रवाहाच्या शेपटात ताऱ्यांची निर्मिती होत आहे.
या नवीन ताऱ्याच्या जन्माची प्रक्रिया अभ्यासल्याने पूर्वीच्या काळी विश्वाची निर्मिती कशी झाली असावी हे समजून येते. जेव्हा वायूने परिपूर्ण असलेल्या दीíघका एकमेकांवर आपटतात तेव्हा आकाशगंगेसारख्या मोठय़ा दीíघका तयार होतात.
मोठा मॅगलानिक ढग हा पृथ्वीपासून एक लाख ६० हजार प्रकाशवष्रे दूर असून लहान मॅगलानिक ढग २ लाख प्रकाशवष्रे दूर आहे तर दोन ढगांमध्ये ७५ हजार प्रकाशवष्रे इतके अंतर आहे. या दोन दीíघका आकाशगंगेभोवती फिरत असतात. त्या बहुदा एकमेकींना प्रदक्षिणाही घालत असतात.
या दोन दीíघकांतून म्हणजे मॅगलानिक ढगांच्या गोन प्रकारातून जे वायू बाहेर पडतात त्यांना मॅगलानिक प्रवाह म्हणतात व त्यात भारहीन हायड्रोजन अणू असतात. एक छोटा प्रवाह मॅगलानिक ढगांच्या दिशेने जातो त्याला अग्र बाहू म्हणतात.
तेथे जन्मणाऱ्या ताऱ्यांचा पुरावा प्रथमच मिळाला आहे असे मिशीगन विद्यापीठाचे डेव्हीड निडेव्हर यांनी सांगितले. या अग्रबाहूच्या टोकाकडून मॅगलानिक प्रवाहाच्या शेवटापर्यंत वायूंचा धागा अवकाशात अर्धा प्रकाशवर्ष इतके अंतर पसरलेला आहे. हे तारे मॅगलानिक ढगातील उष्ण वायू प्रवाहांमुळे जन्मले असले तरी ते आता आपल्या आकाशगंगेभोवती फिरत आहेत. अस्ट्रॉफिजिकल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
आकाशगंगेच्या टोकाला नवीन ताऱ्याचा जन्म
आपल्या आकाशगंगेच्या टोकाच्या बाजूला नवजात ताऱ्यांचे आगमन झाले आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा या संशोधनानुसार दुसऱ्या एका दीर्घिकेतील उष्ण वायू आपल्या आकाशगंगेवर आदळत आहेत.
First published on: 08-04-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New stars being born at our galaxys edge