पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत एकमेव स्पर्धक निकी हॅले यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे सांगून संरक्षणाची मागणी केली आहे.

रिपब्लिकनच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत होणाऱ्या प्राथमिक निवडणुकींच्या फेरीत (प्रायमरी) हॅले ट्रम्प यांच्या स्पर्धक आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हेली यांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढल्याने त्यांनी अमेरिकेच्या ‘सिक्रेट सव्‍‌र्हिस’चे संरक्षण मागितले आहे.

हेही वाचा >>>दिल्ली, प. बंगालमध्ये ‘ईडी’चे छापासत्र; पंतप्रधानांच्या इशाऱ्यानंतर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार हॅले यांची प्रचारमोहीम राबवणाऱ्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांनी ‘सिक्रेट सव्‍‌र्हिस’चे संरक्षण मागण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे. ही विनंती नेमकी कधी केली याचा तपशील मात्र त्यांनी सांगितला नाही. या धमक्या नेमक्या कशाबद्दल दिल्या जात आहेत, याचाही तपशील हॅले यांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेने दिला नाही. अमेरिकेच्या गृहमंत्र्यांच्या परवानगीनंतरच अमेरिकेच्या ‘सिक्रेट सव्‍‌र्हिस’चे संरक्षण पुरवले जाते. ‘काँग्रेस’ सल्लागार समितीशी सल्लामसलत करून गृहमंत्री हा निर्णय घेतात.