शपथविधीपूर्वीच भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मतभेद समोर आले आहेत. मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले आहेत. यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडमधून कोणीही खासदार मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असे नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्रिमंडळात नसलो तरी आम्ही एनडीएसोबतच आहोत हे त्यांनी स्पष्ट केले. नितीश कुमार स्वत: राष्ट्रपती भवनातील पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित रहाणार आहेत. त्यांनी जेडीयूला फक्त एक मंत्रीपद देऊ केले. हा फक्त सरकारमध्ये प्रतीकात्मक सहभाग झाला. आम्हाला गरज नाही हे आम्ही त्यांना कळवले. हा मोठा मुद्दा नाही. आम्ही एनडीएमध्येच आहोत आणि निराशही नाही. आम्ही एकत्र काम करु असे नितीश कुमार यांनी सांगितले.
Bihar CM Nitish Kumar: They wanted only 1 person from JDU in the cabinet, so it would have been just a symbolic participation.We informed them that it is ok we don’t need it. It is not a big issue, we are fully in NDA and not upset at all.We are working together,no confusion. pic.twitter.com/AsDa8EUnUN
— ANI (@ANI) May 30, 2019
नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपाने बिहारमध्ये प्रत्येकी १७ जागा लढवल्या. बिहारमध्ये जदयू-भाजपा आघाडीला ४० पैकी ३९ जागा मिळाल्या आहेत. लोकसभेता भाजपाचे एकटयाचे ३०३ खासदार असून एनडीएचा आकडा ३५० च्या पुढे आहे. लोकसभेत बहुमतासाठी २७२ खासदारांची आवश्यकता आहे.