पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताचा नारा दिलेला असल्याने देशातील सर्व राज्यांबरोबरच महाराष्ट्रातीलही ४४ शहरे स्वच्छ असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या चालू वर्षातील स्वच्छता सर्वेक्षण अहवालात नवी मुंबई आठव्या क्रमांकावर तर पुणे १३ व्या आणि मुंबई २९ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आणखी थोडे प्रयत्न केल्यास येत्या काळात महाराष्ट्राला आणखी पुढे जाण्याची संधी आहे.
या अहवालातील नोंदीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर असून, याच राज्याची राजधानी असलेले भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेशातील गोंडा हे शहर सर्वात अस्वच्छ असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हे सर्वेक्षण जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आले.
यावर्षीच्या पहिल्या पाच स्वच्छ शहरांमध्ये इंदूर आणि भोपाळनंतर विशाखापट्टणम, सूरत, आणि तिरुचिरंपल्ली या शहरांचा समावेश आहे. २०१६ मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेले म्हैसूर यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर गेल्याचे दिसते आहे. तर मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चंदीगडचा यावर्षी पहिल्या पाचमध्येही समावेश नाही.
शहराचे नाव क्रमांक
नवी मंबई ८
पुणे १३
मुंबई २९
शिर्डी ५६
पिंपरी-चिंचवड ७२
चंद्रपूर ७६
अंबरनाथ ८९
सोलापूर ११५
ठाणे ११६
धुळे १२४
मिरा-भायंदर १३०
नागपूर १३७
वसई-विरार १३९
इचलकरंजी १४१
नाशिक १५१
सातारा १५७
बदलापूर १५८
जळगाव १६२
पनवेल १७०
कोल्हापूर १७७
नंदूरबार १८१
अहमदनगर १८३
नांदेड १९२
उल्हासनगर २०७
उस्मानाबाद २१९
परभणी २२९
यवतमाळ २३०
अमरावती २३१
कल्याण-डोंबिवली २३४
सांगली २३७
मालेगाव २३९
उदगिर २४०
बार्शि २८७
अकोला २९६
औरंगाबाद २९९
बीड ३०२
अचलपूर ३११
वर्धा ३१३
लातूर ३१८
गोंदिया ३४३
हिंगणघाट ३५५
जालना ३६८
भिवंडी-निजामपूर ३९२
भुसावळ ४३३