scorecardresearch

इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव

पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाझ शरीफ यांनी सोमवारी नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास ठराव मांडला.

(संग्रहीत)

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरुद्ध विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाझ शरीफ यांनी सोमवारी नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास ठराव मांडला.  १६१ सदस्यांनी ठरावाला अनुकूलता दर्शवली. यानंतर, अविश्वास ठराव मांडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सभागृहाचे उपाध्यक्ष कासीम खान सुरी यांनी सांगितले. यापाठोपाठ शरीफ यांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर  प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. ठरावावर ३ ते ७ दिवसांत मतदान घ्यायचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No confidence motion against imran khan zws

ताज्या बातम्या