गुवाहाटी महानगरपालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीमध्ये जिल्ह्यातील स्पा, सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीकडून सेवा देण्यास किंवा मसाजला परवानगी नाही, यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. “आम्ही स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादींसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता भिन्नलिंगी व्यक्ती याठिकाणी थेरपी किंवा मसाज करू शकणार नाही,” असे गुवाहाटी महानगरपालिकेचे सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांनी सांगितले.

“तसेच स्पा, सलून, ब्युटी पार्लरमध्ये कोणतेही विशेष चेंबर किंवा खोली असू नये आणि मुख्य दरवाजा पारदर्शक असावा,” असेही ते पुढे म्हणाले.

सहआयुक्त सिद्धार्थ गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, “हे नियम काही स्पा आणि युनिसेक्स पार्लरबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. हे स्पा आणि पार्लर नागरी समाजासाठी हानिकारक असल्याची नागरिकांची तक्रार होती, असे त्यांनी सांगितले.