कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या वापरण्याची गरज नसल्याचे भारत बायोटेकने सांगितले आहे. काही लसीकरण केंद्रांवर मुलांना कोव्हॅक्सिनचा डोस दिल्यानंतर ५०० मिलीग्राम पॅरासिटामॉलच्या तीन गोळ्या घेण्यास सांगितले जात आहे, अशी माहिती मिळाल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

भारत बायोटेकने ट्विटर करत म्हटले आहे की, “आम्हाला अभिप्राय मिळाला आहे की काही लसीकरण केंद्रे मुलांसाठी कोव्हॅक्सिनसह ५०० मिलीग्रामच्या तीन पॅरासिटामॉल गोळ्यांची शिफारस करत आहेत. कोव्हॅक्सिनची लस दिल्यानंतर कोणत्याही पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करणाऱ्या औषधांची शिफारस केली जात नाही.”

Covid-19 Vaccines for Children’s : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

कंपनीने सांगितले की, आम्ही लस घेतल्यानंतर कोणतीही पॅरासिटामॉल किंवा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या घेण्याची शिफारस करत नाही. कोविड लसीच्या इतर काही डोससह पॅरासिटामॉल घेण्यास सांगितले जात आहे, पण लस घेतल्यानंतर असे कोणतेही औषध घेण्याचा सल्ला दिला जात नाही.

कंपनीने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, लसीच्या वैद्यकीय चाचण्यांदरम्यान ३०,००० लोकांपैकी १० ते २० टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम दिसून आले. आम्ही सुमारे ३०,००० लोकांवर वैद्यकीय चाचणी केली, ज्यामध्ये १० ते २० टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम दिसून आले. बहुतेक साइड इफेक्ट्स सौम्य होते. ते एक ते दोन दिवसात बरे झाले आणि त्यासाठी कोणत्याही औषधाची आवश्यकता लागली नाही.

८४ वर्षांच्या वृद्धानं तब्बल ११ वेळा घेतली करोनाची लस; कारण विचारलं असता म्हणाला, “मला लस घेऊन…”

करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन सरकारने १५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या वयोगटातील बालकांची लसीकरण मोहीम ३ जानेवारीपासून सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचे दोन डोस मुलांना दिले जातील. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल. त्याच वेळी, भारत बायोटेकने मुलांवर कोवॅक्सीन (BBV152) च्या फेज २ आणि फेज ३ च्या वैद्यकीय चाचण्यांचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत.