scorecardresearch

Premium

नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल

नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली.

yuhan force , Norwegian Nobel Prize in Literature to Euan Foss
नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल

एपी, स्टॉकहोम

नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली. फोस यांची ‘नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यलेखन’ यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे पुरस्कार समितीने सांगितले.

A plot to Malini for a dance academy at a very modest rate Mumbai
‘नृत्य अकादमी’साठी हेमा मालिनी यांचा ‘भूखंडशोध’
Gulzar, Sanskrit scholar Rambhadracharya selected for Jnanpith Award
प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव
Raj Thackeray on Bharatratna Award
“भाजपाने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर…”, भारतरत्न पुरस्कारांवरून राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
bharatratna awards
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कुणाकुणाला भारतरत्न पुरस्कारनं गौरवण्यात आलं? त्यामागील सरकारची भूमिका काय?

युआन फोस यांच्या कादंबऱ्या आणि लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकेही मोठय़ा प्रमाणात वाखाणली गेली आहेत. त्यांच्या कथानक आणि भाषेमध्ये नॉर्वेच्या पार्श्वभूमीची पाळेमुळे दिसून येतात असे पुरस्कार समितीचे अँड्रेस ओस्लोन म्हणाले. फोस यांनी ४० नाटके व कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची पुस्तके, कविता आणि ललित निबंध लिहिले आहेत. ‘नोबेल समितीचा आपल्याला फोन आल्यानंतर फार आनंद झाला’, अशी प्रतिक्रिया फोस यांनी नॉर्वेची वृत्तसेवा एनआरकेशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा >>>भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी बसने तोडला सिग्नल, अन् थेट कारला दिली धडक, थरारक अपघात Video व्हायरल

फोस यांच्या लिखाणातून अव्यक्त भावनांना शब्दरूप मिळते असा गौरव अकादमीने केला. अकादमीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माल्म यांनी फोस यांच्या नावाची घोषणा केली. नोबेल पुरस्काराची रक्कम ११० लाख स्विडिश क्रोनर (१० लाख डॉलर) इतकी आहे. त्याशिवाय पुरस्कारप्राप्त विजेत्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळय़ात १८ कॅरेटचे सुवर्णपदक आणि डिप्लोमाही प्रदान केला जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Norwegian nobel prize in literature to euan foss amy

First published on: 06-10-2023 at 01:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×