पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील डमडम कॅन्टोन्मेट रेल्वे लाइनवर बॉम्बस्फोट झाला असून घटनास्थळावरून दहा जिवंत बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती कळू शकलेली नाही.

https://twitter.com/ANI/status/983205556180652033
सोमवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोलकाता पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला असून परिसरात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/983211444467617792