कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने दिवाळीनंतर होणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचे दिवाळे निघण्याची भीती काँग्रेस जनांना आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे भाव नक्की कमी होतील असा आशावाद काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे. त्यात आता खाद्यान्न मंत्री के.व्ही थॉमस यांनी येत्या दहा दिवसात कांद्याचे भाव कमी होणार असल्याचे म्हटले आहे.
कांद्यामुळे काँग्रेसचा वांदा होणार?
प्रचाराची धामधूम सुरु असताना दिल्लीत कांद्याने प्रतिकिलो ९० रुपयांचा दर गाठला आहे. तर जम्मू, पटना येथे कांद्याच्या भावाने शंभरी गाठली आहे.
के.व्ही थॉमस म्हणाले, “कांद्याचे भाव येत्या दहा दिवसात कमी होतील. विक्रेत्यांनी जादा किंमत आकारून ग्राहकांची लूट करू नये. शेतकऱयांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि ग्राहकांनाही योग्य किंमतीत कांदा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार योग्य ते प्रयत्न करत आहे.”
वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे भाववाढ
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2013 रोजी प्रकाशित
कांद्याचे भाव येत्या दहा दिवसात कमी होतील- के.व्ही.थॉमस
आता खाद्यान्न मंत्री के.व्ही थॉमस यांनी येत्या दहा दिवसात कांद्याचे भाव कमी होणार असल्याचे म्हटले आहे.

First published on: 25-10-2013 at 02:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices to come down in next 10 days thomas