नवी दिल्ली : ‘ऑपरेशन महादेव’अंतर्गत सोमवारी श्रीनगरच्या बाहेरील भागात मारले गेलेले तीन दहशतवादी हेच २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी झाले होते. दाचिगाम वनक्षेत्रात मारले गेलेल्यांची नांवे सुलेमान उर्फ फैसल, अफगाण आणि जिब्रान अशी आहेत, हे सर्व पाकिस्तानहून आले होते. सुलेमान हा लष्कर ए तय्यबाचा कमांडर होता. गगनगीर हल्ल्यातही त्याचा सहभाग होता, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांन लोकसभेत मंगळवारी दिली.

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगाममधील दहशवादी पाकिस्तानातून आले याचे काय पुरावे सरकारकडे आहेत, असा प्रश्न विचारला होता. त्यावर, पहलगामधील हल्लेखोरांनाच ठार करण्यात आले आहे, याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. तीनपैकी दोघांचे आमच्याकडे पाकिस्तानातील मतदार क्रमांक देखील आहेत. त्यांच्या रायफली पाकिस्तानी बनावटीच्या आहेत. त्यांच्याकडे सापडलेले चॉकलेटदेखील पाकिस्तानात तयार केले गेले होते. हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, असे शहांनी सांगितले.

‘ऑपरेशन महादेव’मध्ये ‘एनआयए’ची भूमिका

  • दहशतवाद्यांना मदत करणारे ‘एनआयए’च्या ताब्यात
  • ठार करण्यात आलेले तीन दहशतवादी पहलगाम हल्ल्यामधीलच असल्याची ‘एनआयए’कडून पुष्टी
  • हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेल्या काडतुसांचे विश्लेषण
  • सोमवारी दहशतवाद्यांकडून जप्त तीन रायफली चंडीगडला पाठवल्या, काडतुसे जुळवून पाहिली
  • एक एम-९ अमेरिकन रायफल, दोन एके-४७ रायफलींचा समावेश
  • सहा तज्ज्ञांकडून काडतुसांवरील बॅलिस्टिक अहवालाची पडताळणी
  • याच तीन रायफलींचा वापर पहलगामध्ये केल्याचे सिद्ध

पहलगाममध्ये दुपारी १ वाजता हल्ला झाला आणि संध्याकाळी ५.३० वाजता मी तिथे होतो. २३ एप्रिल रोजी सुरक्षा बैठक झाली. २२ मे रोजी गुप्तचर यंत्रणांना दहशतवाद्यांची खबर मिळाली. त्यांची पुरती नाकाबंदी केली गेली. २२ मे रोजी दहशतवाद्यांना आश्रय देणारा बशीर व परवेझ यांना अटक केली गेली. २१ एप्रिल रोजी तीन दहशतवादी आले होते. त्यांच्याकडे रायफल होत्या. त्यांनी जेवण घेतले, चहा घेतला, अशी माहिती या दोघांनी दिली होती. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.