Kolkata Doctor Rape and Murder : कोलकाता येथील आर. जी. कर मेडीकल महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला आहे. या घटनेचे अनेक पैलू रोज समोर येत आहेत. अशात आता पद्म पुरस्कार विजेत्या ७० डॉक्टरांनी पीडितेला न्याय द्या अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.

नेमकी ही घटना काय घडली?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. आता पद्म विजेत्या डॉक्टरांनी या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

nursing exam peper leaked in buldhana
परिचारिका अभ्यासक्रमाचा पेपर फुटला, बुलढाण्यात विद्यार्थ्यांकडे आढळली…
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
mumbai University indifferent to preservation of historical coins in its collection Mumbai
संग्रही असलेल्या ऐंतिहासिक नाण्यांचे जतन करण्याबाबत मुंबई विद्यापीठ उदासीन
Nitin Gadkari, Arun Bongirwar Award,
गडकरी म्हणतात, “चुकून राजकारणात आलो, नाहीतर नक्षलवादी चळवळीत जाऊन…”
youth congress taluka president rape
चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?

हे पण वाचा- Kolkata Doctor Rape and Murder : “रुग्णालयात तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या शरीरावर फक्त..”, कोलकाता पीडितेच्या आईने सांगितलं वास्तव

पद्मविजेत्या डॉक्टरांनी काय म्हटलं आहे पत्रात?

“R G Kar या मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत भीषण आणि तितकीच चिड आणणारी आहे. महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेली तिची हत्या यामुळे देश हादरला आहे. आम्ही सगळे डॉक्टर्स या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही विनंती करतो आहोत की या प्रकरणात तुम्ही जातीने लक्ष घातलं पाहिजे. आरोग्य सेवा देण्याचं काम डॉक्टर करत असतात. अशात त्यांच्या सुरक्षेबाबत आणि खास करुन महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत हा प्रश्न भेडसावतो आहे त्याची दखल घ्या आणि या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा द्या.” अशी मागणी पद्म विजेत्या डॉक्टरांनी केली आहे. एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया, मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉक्टर नरेश तेहान, डॉ. हर्ष महाजन, फोर्टिसचे संचालक अशोक सेठ, एम्सचे माजी संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासह ७० हून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

या डॉक्टरांनी जे पत्र लिहिलंय त्यात काय मागण्या केल्या?

महिला डॉक्टरचा लैंगिक छळ, बलात्कार किंवा या प्रमाणे काही घटना घडल्या तर कठोरातली कठोर शिक्षा द्यावी.

मेडिकल महाविद्यालयं, रुग्णालयं या संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी या रुग्णालयांची आहे. त्या दृष्टीने ती यंत्रणा कार्यरत असलीच पाहिजे.

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्यास जलद गतीने न्याय मिळावा.

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला, इतर काही घटना घडल्या तर आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या सगळ्यांनी केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

पीडित मुलीचा मृत्यू ( Kolkata Doctor Rape ) झाल्याचं जेव्हा तिच्या आई वडिलांना सांगण्यात आलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता असं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. पोलीस तपासावरुन हे समोर येतं आहे की पहाटे ३ ते ५ या कालावधीत तिच्यावर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला, तसंच तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता ७० डॉक्टरांनी मोदींना पत्र लिहिलं आहे.