Modi Government Updates : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा उलटून गेला आहे. या हल्ल्यामुळे भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच अमेरिकेने दोन्ही देशांना संघर्ष न वाढवण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आज चर्चा करतील असंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला एनआयए व इतर संरक्षण दलं काश्मीर खोऱ्यात पहलगाम हल्ल्याप्रकरणी तपास करत आहेत. २६ पर्यटकांना ठार मारून फरार झालेले दहशतवादी काश्मीर खोऱ्यात लपल्याचं सांगितलं जात आहे. एनआयएचा तपास, उभय देशांकडून एकमेकांवर होणारी कुरघोडी व त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे परिणाम या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बुधवारी (३० एप्रिल) पाच उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये काय चर्चा झाली, कोणते निर्णय घेण्यात आले, याविषयीची फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज याबद्दलची माहिती समोर येऊ शकते.
Pahalgam Terror Attack Live : पहलगाम हल्ला, त्यानंतर निर्माण झालेला भारत-पाकिस्तान तणाव आणि इतर राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
"मुस्लिमांना, काश्मिरींना लक्ष्य करू नका"; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचे आवाहन
Farooq Abdullah: "दोन्ही देश लढाईसाठी…", भारत-पाकिस्तान युद्धाची चर्चा असताना फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान
Supreme Court: पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
काश्मिरी शाल विक्रेत्यांना मारहाण प्रकरणी मसूरी पोलिसांकडून तिघांना अटक
उत्तराखंडमधील मसूरी शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ पाहून लोकांमधून संतापाची लाट उसळली होती. मसूरीत दोन काश्मिरी शाल विक्रेत्यांना काही लोकांनी शिव्या दिल्या व मारहाण करून हुसकावून लावलं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मसूरीमधील मॉल रोडवर हे काश्मिरी तरुण शाल विकत होते. मात्र, काही लोकांनी त्यांना मारहाण करत तिथून हुसकावून लावलं. त्यानंतर १६ काश्मिरी शाल विक्रेत्यांनी मसुरी सोडत देहरादुन गाठलं आहे. दरम्यान, मसूरी पोलिसांनी काश्मिरी शाल विक्रेत्यांच्या मारहाण प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
Muhammad Asim Malik : पाकिस्तानने ISI प्रमुखांवर का सोपवली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी? मुहम्मद असीम मलिक कोण आहेत?
'या' २१ देशात जाणं धोकादायक, अमेरिकेचा प्रवाशांना इशारा; यादीत भारताच्या शेजारी राष्ट्रांचा समावेश
"आम्ही मध्येच अडकतो, काश्मिरी जनतेला भोगावं लागतं", पहलगाम हल्ल्याबाबत फारुख अब्दुल्लांचं वक्तव्य
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले, पहलगाममधील घटना खूप वेदनादायक होती. अशा घटनांमुळे समाजातील द्वेष वाढतो, दरी वाढते. लोकांमध्ये द्वेष पसरवणे हा कोणाचा हेतू आहे? ते लोक असं का करत आहेत? त्यातून त्यांना काय फायदा मिळणार आहे? हे आम्हाला माहिती नाही. मात्र आम्ही मात्र मध्येच अडकतो. गेल्या ३०-३५ वर्षापासून आम्ही हे सगळं पाहतोय. काश्मिरी जनतेला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
बलुचिस्तानमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन, संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाकिस्तानची कानउघडणी
"मोदींकडे लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकार नाही", प्रकाश आंबेडकरांचा टोला; नेमकं काय म्हणाले?
Pahalgam Terror Attack: अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चेनंतर जयशंकर यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, "पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार…"
Pahalgam Attack : दहशतवाद्यांचं टूलकीट तपास यंत्रणांच्या हाती, सांकेतिक शब्दांपासून पोशाख व शस्त्रांसंबंधीची माहिती समोर
Lawrence Bishnoi : "अशा एकाला मारू, जो लाखाच्या बरोबरीचा असेल"; बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी? पोस्ट व्हायरल
ट्रम्प यांच्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश महत्त्वाचे : व्हाइट हाऊस
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीरमधील परिस्थितीबाबत अमेरिका दोन्ही देशांशी संपर्क साधत त्यांना संघर्ष वाढवू नका असे आवाहन करत आहे. परराष्ट्रमंत्री रुबियो हे इतर देशांचे नेते आणि परराष्ट्रमंत्र्यांनाही दोन्ही देशांशी या मुद्द्यावर चर्चा करायला सांगत असल्याची माहिती ब्रुस यांनी दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश महत्त्वाचे आहेत असे ते म्हणाले.
भारत पाकिस्तान तणावावर सौदी अरबची प्रतिक्रिया
सौदी अरबच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत व पाकिस्तानला अंतर्गत तणाव करमी करण्याचं आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच चांगल्या शेजारधर्माचं पालन करून, आपापल्या देशातील लोकांच्या हितासाठी स्थिरता व शांततेसाठी प्रयत्न करावेत, असंही म्हटलं आहे.