पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या ४८ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल मनीष मेहता यांनी दिली.
मेढर क्षेत्रात सकाळी पाकिस्तानी सैनिकांनी लहान आणि स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने गोळीबार केला. भारताच्या फौजांनी त्यास तसेच चोख प्रत्युत्तर दिल्याचे मेहता यांनी सांगितले. याआधी शनिवारीही पाकिस्तानच्या सैनिकांनी पूँछ भागात गोळीबार केला होता, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे दुसऱ्यांदा उल्लंघन
पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या ४८ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
First published on: 11-08-2014 at 12:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak fires at loc posts again second ceasefire violation in 48 hrs