नागरिकांना याच्या झळा बसू लागल्या आहेत. पाकिस्तानमधली महागाई सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. अन्नधान्य देखील करणंदेखील तिथल्या सामान्य नागरिकांना अवघड जात आहे. दुसऱ्या बाजुला देशातली बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. दररोज हजारो पाकिस्तानी तरुण नोकऱ्या गमावत आहेत. या वर्षात लाखो पाकिस्तानी तरुणांच्या नोकऱ्या जाणार अशी परिस्थिती उद्भवली आहे. पाकिस्तानमधील आघाडीचं वृत्तपत्र डॉनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, २०२३ मध्ये पाकिस्तानातील एकूण बेरोजगारांची संख्या ६२.५ लाखांच्या आसपास आहे. देशातल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी हे प्रमाण ८.५ टक्के इतकं आहे.

लवकरच पाकिस्तान सरकार एक छोटा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात जर आयएमएफने मांडलेल्या शिफारसी मान्य केल्या तर हा अर्थसंकल्प पाकिस्तानमधल्या नागरिकांना जबर धक्का देईल. कारण अर्थसंकल्पात आयएमएफच्या शिफारसी मान्य केल्या तर गॅस, वीज, पेट्रोलियमसह अनेक वस्तूंच्या किंमती वाढतील. तसेच यामुळे पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा देखील कमी होणार आहे. १३ जानेवारीपर्यंत, पाकिस्तानकडे फक्त ४.६ अब्ज डॉलर इतका परकीय चलानाचा साठा होता.

भारतासमोर मोठं संकट

पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. या दहशतवादी संघटना भारताविरोधात कट रचण्यासाठी, हल्ले करण्यासाठी बेरोजगार तरुणांच्या शोधात असतात. बेरोजगार तरुणांना थोड्याश्या पैशांचं अमिष दाखवल्यानंतर हे तरुण सहज दहशतवादाच्या वाटेवर येतात. अनेक तरुण आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दहशतवादाचा मार्ग स्वीकारू शकतात. याचा भारताला सर्वाधिक धोका आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती सुधारेल असं दिसत नाही. त्यामुळे हे वर्ष तसेच २०२४ देखील पाकिस्तानसाठी तिथल्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असेल. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये रिफायनरी, कापड, लोह, ऑटोमोबाईल आणि खताशी संबंधित उत्पादने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

हे ही वाचा >> विश्लेषण : पाकिस्तानमध्ये वीजेची समस्या गंभीर का झाली आहे? सोमवारी अनेक भागात वीज पुरवठा का खंडीत झाला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये २५ कोटींच्या आसपास लोक राहतात. यापैकी ६२.५ टक्के लोक हे काम करू शकतात. परंतु यापैकी बहुतांश लोकांच्या हाताला काम नाही. पाकिस्तानमधील वाढती बेकारी संघठित गुन्हेगारीला खतपाणी घालू शकते. मुळातच पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण अधिक आहे. त्यातच बेरोजगार तरुणांच्या वाढत्या संख्येमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. बेरोजगार तरुण पाकिस्तानमधील पोलिसांना हैराण करतील, तसेच याचा भारताला देखील धोका आहे.