Investment Scam Busted : गेल्या काही वर्षांमध्ये देशात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना लुटत आहेत. यादम्यान मध्यप्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ने संपूर्ण देशभरात चालवला जाणारा अंदाजे २,२८२ कोटी रूपयांचा गुंतवणूक घोटाळा उघड केला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या दीपक शर्मा आणि मदन मोहन या दोघांना पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये सात राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना बॉटब्रो सारख्या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या नावाखाली फसवण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म शेल फर्ल यॉर्कर एफएक्स आणि यॉर्कर कॅपिटलद्वारे चारवला जात होता.

२०.१८ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिन्याला ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करत इंदोरमधील रहिवासी इशान सलुजा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

तपासात काय समोर आलं?

तपासात माहिती समोर आली की आरोपी हा गुंतवणुकदारांचे पैसे Rainet टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि Kindent बिझनेस सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या खात्यात गोळा केले जात होते आणि नंतर फॉरेक्स ट्रेडिंगसाठी मेटा-५ खात्यातून हा पैसा यूएसडीमध्ये हस्तांतरित केला जात होता.

एसटीएफने जवळपास २० संशयास्पद बँक खात्यातील ९० कोटींची रक्कम गोठवली आहे.

तसेच Kindent बिझनेस सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एमसीए (मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स)कडे १.१० कोटीचे ट्रायल बॅलेन्स जाहीर केले असल्याचेही तपासात समोर आले आहे. तर जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांच्या बँक खात्यांमध्ये झालेले प्रत्यक्ष व्यवहार सुमारे ७,०२० कोटी रुपयांचे होते.

याचप्रकारे Rainet टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये ट्रायल बॅलेन्स ७.८० कोटी रुपये असल्याचा दावा केला, पण याच काळात त्यांचे व्यवहार हे १५,८०० कोटी रूपयांचे झाले आहेत. एकत्रितपणे या दोन्ही कंपन्यांना १६ बँक खात्यांमध्ये अंदाजे २२,८३० कोटी रुपये मिळाले, जे नंतर इतर अज्ञात खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले.

दोन्ही कंपन्या आरबीआय किंवा सेबीकडे नोंदणी न करताच काम करत होत्या, ज्यामुळे अनेक आर्थिक आणि रेग्युलेटरी नियमांचे उल्लंघन झाले आहे.

ईडी देखील फेमा कायद्याच्या अंतर्गत या प्रकरणाचा तपास करत आहे. याबरोबरच बॉटब्रो (BotBro) वेबसाईट देखील बंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमधील लोकांची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे.