एरवी वादविवाद आणि गोंधळाचं चित्र दिसणाऱ्या राज्यसभेत आज वेगळंच वातावरण होतं. प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्या भावनिक छटा झळकत होत्या. निमित्त होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांच्या निरोपाचं. चार सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी आझादांविषयीच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले. तर संजय राऊत यांनीही ‘काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब’ अशी उपमा देत कौतूक केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेतील कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देताना संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केलं. राऊत यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. राऊत म्हणाले,”गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब आहे. त्यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे आम्हीही भावूक झालो. ज्यांच्यासोबत काम केलं. ती व्यक्ती आज सभागृहातून जात आहे. मला विश्वास आहे की, ते पुन्हा सभागृहात परत येतील. त्यांनी इंदिरा गांधीपासून ते मोदीजींपर्यंतचा काळ बघितला. त्यांनी इंदिरा गांधी ते मोदी असं पुस्तक लिहायला हवं. जेव्हा दिल्लीच्या राजकारणात मोठंमोठी माणसं होती. तेव्हा आझादांसारखी एक व्यक्ती गावातून येते आणि यशस्वी झाले,” असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा- आझाद यांना वाशिममधून पाडायचं ठरवलं, पण…; शरद पवारांनी सांगितला १९८२चा किस्सा

आणखी वाचा- मुस्लिम एकमेकांशी लढून संपत आहेत, तिथे तर हिंदू नाहीत; गुलाम नबी आझाद यांचा सवाल

“त्यांचं महाराष्ट्रासोबत त्यांचं फार जुनं नातं आहे. जसं की शरद पवारांनी सांगितलं की, त्यांनी वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. निवडून आले होते. त्यामुळे तिथे आजही त्यांच्याविषयी बोललं जातं. ते मराठीतून बोलतात. मोदी जसं मराठीतून बोलतात.. तसं आझादही बोलतात. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. पण, संपूर्ण देश जाणतो, असे आझादांसारखे नेते खूप कमी आहेत. मी आझाद यांना निरोप देत नाही. ते परत सभागृहात येईपर्यंत मी त्यांची वाट बघेन,’ अशा भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament updates emotions runs high farewell to congress veteran ghulam nabi azad sanjay raut bmh
First published on: 09-02-2021 at 12:08 IST