जम्मू-काश्मीरमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. येथील एका पाळीव श्वानामुळे दहशतवादी हल्ल्यातून कुटुंबाचा जीव वाचला आहे. मिशेल असं या श्वानाचे नाव आहे. कुटुंबासह शेजाऱ्यांचा जीव वाचवल्याने या श्वानाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सायंकाळी जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी फायरिंगचा आवाज आल्यानंतर मिशेलने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. त्याच्या या आवाजाने निर्मला देवी आणि त्यांची नात घराबाहेर आली. यावेळी त्यांना दहशतवादी त्यांच्या घराकडे येताना दिसले. हे चित्र पाहून निर्मलादेवी यांनी प्रसंगावधान दाखवत लगेच घराचा दरवाजा आतून बंद केला. यामुळे संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचले.

हेही वाचा- ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्यानंतर २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची अधिक माहिती देताना निर्मलादेवी म्हणाल्या, “मिशेलने भुंकायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही स्वयंपाकघरात होतो. मिशेल कधीही इतक्या मोठ्या भुंकत नाही, त्यामुळे आम्ही काय झालं, बघायला बाहेर आलो, तेव्हा काही दहशतवादी आमच्या घराच्या दिशेनं येत असल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही लगेच घराचा दरवाजा आतून बंद केला. यावेळी दहशतवाद्यांनी मिशेलवर सुद्धा गोळीाबार केला. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच मिशेलच्या भुंकण्याने शेजारीही सतर्क झाले, त्यामुळे त्यांचेही प्राण वाचले आहेत.”