पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी भूतानच्या महाराजांनी मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ हा पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान मोदी हे प्रथम बिगर भूतानी नागरिक आहेत. या पुरस्काराचे भूतानमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. या पुरस्काराची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत केवळ चार मान्यवारांना पुरस्कार प्रदान केला गेला आहे. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत १५ देशांचा सर्वोच्च नागरि पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

या पुरस्कारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून भारतातील १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने भूतानच्या या महान भूमीतील हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो. तसेच या सन्मानासाठी भूतानचे आभार मानतो.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi first non bhutanese head of state to be awarded order of the druk gyalpo kvg
First published on: 22-03-2024 at 18:48 IST