पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाने अदाणी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याचा दौरा करत आहेत. एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, “तुम्ही मागचे पाच वर्ष पाहिले असेल की, काँग्रेसचे राजकुमार अदाणी आणि अंबानी यांच्या नावाचा जयघोष करत होते. मात्र निवडणूक जाहीर होताच अचानक त्यांनी अदाणी आणि अंबानी यांच्याविरोधात बोलणं बंद केलं आहे. दोन्ही उद्योगपतींकडून त्यांना किती बॅगा भरून काळा पैसा मिळाला? अदाणी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? ज्यामुळे आता एका रात्रीत राहुल गांधी यांचा दृष्टीकोन बदलला.”

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत असताना पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच उद्योगपती अदाणी-अंबानी यांचे नाव घेतले आहे. भाजपा आणि पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींना धार्जिणे निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज लादून भांडवलदारांना कोट्यवधींची कर्जमाफी दिली, असा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात होता.

सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर देत असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, “राहुल गांधी अदाणी-अंबानी यांचे नाव घेतल नसले तरी ते रोज उद्योगपतींबद्दल बोलत आहेत. त्यांचे सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपा आणि बड्या उद्योगपतींचे साटेलोटे असल्याचे आम्ही उजेडात आणत आहोत. पंतप्रधान मोदींनी आपल्या मित्रांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्यमे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांची कर्जमाफी केली जात नाही.”

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही पंतप्रधान मोदींच्या विधानाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, तीन टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता वेळ बदलली आहे. मित्र आता मित्र राहिलेले नाहीत. पंतप्रधान मोदी आता आता आपल्या मित्रांवरच टीका करत आहेत. याचा अर्थ मोदींच्या खुर्चीला आता हेलकावे बसू लागले आहेत. यावरूनच निकालाचा कल काय असेल, हे दिसत आहे.

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जेपी नड्डांना बंगळुरू पोलिसांनी बजावला समन्स, निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगणातील सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा उल्लेख केला. “भाजपाने राष्ट्रप्रथम हे धोरण नजरेसमोर ठेवून निर्णय घेतले. तर दुसरीकडे काँग्रेस आणि बीआरएससारखे पक्ष कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात. कुटुंबियांद्वारे कुटुंबियांसाठी या पक्षांनी व्यवस्था उभारली. या कुटुंबप्रथम योजनेमुळेच काँग्रेसने माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांना दुर्लक्षित केले आणि त्यांचा अवमान केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यासही विरोध केला गेला. एनडीएने पीव्ही नरसिंहराव यांचा सन्मान केला आणि त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले.