नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाबद्दल विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी राज्यसभेत कौतुक केले. मनमोहन सिंग हे खासदारांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत असल्याची प्रशंसा मोदींनी केली.

राज्यसभेतील सदस्यत्वाचा मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्यांच्यासह अन्य निवृत्त होणाऱ्या सदस्यांना गुरुवारी सदनाने निरोप दिला. त्यावेळी वरिष्ठ सभागृहात मोदींनी तत्कालीन पंतप्रधानांबद्दल गौरवोद्गार काढले. ते दीर्घायुषी व्हावेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहावेत अशी मी प्रार्थना करतो, असे मोदी म्हणाले.

Uddhav Thackeray criticize Prime Minister Narendra Modi in amravati
“मोदी म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान, ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण…”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Why Nitin Gadkari said If BJP government comes will some be sent to Pakistan in front of Prime Minister Narendra Modi
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”

हेही वाचा >>>मोदींचं ४०० जागांचं स्वप्न भंगणार? इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? वाचा ओपिनिअन पोलचे अंदाज काय सांगतात

दिल्ली सरकारच्या अखत्यारितील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार काढून घेणारे विधेयक गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने संसदेत मांडले होते. लोकसभेत सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्याने तिथे विधेयेक संमत होणारच होते. पण, राज्यसभेतही केंद्र सरकारने या विधेयकासाठी पुरेसे संख्याबळ उभे केले होते. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या विधेयकावर मतदान करण्यासाठी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून सभागृहात आले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही ते व्हिलचेअरवर बसून आले होते. त्यातून त्यांची लोकशाहीवरील निष्ठा दिसते!

हेही वाचा >>>गिर्यारोहणासाठी गेलेल्या युवक-युवतीचा मृत्यू, पाळीव श्वानाने ४८ तास केली राखण, डोळ्यात पाणी आणणारी घटना

दिल्लीच्या विधेयकावेळी राज्यसभेतही सत्ताधारी आघाडीचा विजय होणार हे निश्चित असतानाही मनमोहन सिंग मतदानासाठी आले होते. वरिष्ठ सभागृहाचा सदस्य म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले होते. त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी आहे, असे मोदी म्हणाले. नेता म्हणून मनमोहन सिंग यांचे योगदान मोठे आहे. वैचारिक मतभेद असू शकतात पण, त्यांनी प्रदीर्घ काळ या सभागृहाला तसेच, देशाला मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक वेळी झालेल्या चर्चामधील त्यांचे योगदान स्मरणात राहील, असेही मोदी म्हणाले.

राज्यसभेचे विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, मनमोहन सिंग यांच्या गौरवोद्गाराबद्दल मोदींचे आभार मानले. चांगल्या कामाचे कौतुक करा, असे खरगे म्हणाले. मनमोहन सिंग सहा वेळा खासदार झाले. २००४-१४ या दहा वर्षांमध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. नरसिंह राव सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. त्यांच्याच काळात देशाची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली.