उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताला लवकरच ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवणार असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Congress Election : ४५ वर्षांत प्रथमच काँग्रेस कार्यकारिणीच्या पदांसाठी निवडणुका घेण्याची घोषणा

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“जग कोविड-१९ चा सामना करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पातळीवर आयात-निर्यातीत अनेक अडचणी निर्माण झाल्यात आहेत. आम्हाला भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज भारतात ७० हजारांहून अधिक स्टार्ट-अप सुरू झाले आहेत. आम्ही विकासावर आमचे लक्ष केंद्रीत करत आहोत. मला आनंद आहे की, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा – शिवसेना-काँग्रेसवर टीका करताना शिंदे समर्थक आमदाराची जीभ घसरली; वादग्रस्त विधानात म्हटलं, “वीरो के दुश्मन होते है, शेरों…”

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर नेत्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि व्यापारवाढीवर चर्चा झाली. तत्पूर्वी उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह आणि समरकंदचे राज्यपाल यांनी पंतप्रधान मोदींचे समरकंदमध्ये स्वागत केले. समरकंदमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचे दोन सत्र होणार आहेत. पहिल्या सत्रात केवळ शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य सहभागी होणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये इतर देशांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi address sco summit 2022 samarkand said we want to transform india into manufacturing hub spb
First published on: 16-09-2022 at 15:11 IST