पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये नव्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असेल? कोणाला संधी मिळणार ? कोणाला नाही? ते आता स्पष्ट झाले आहे. पण मोदींच्या मंत्रिमंडळात चार महत्वाच्या खात्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार त्याबद्दल सस्पेंस अजूनही कायम आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय ही महत्वाची खाती आहेत.

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी सूत्रांची माहिती आहे. अमित शाह यांना कुठले महत्वाचे खाते मिळणार त्याबद्ल उत्सुक्ता आहे. केंद्रात सलग दुसऱ्यांदा भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार आणण्यात अमित शाह यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

राजनाथ सिंह पहिल्या टर्ममध्ये गृहमंत्री होते. सरकारमध्ये त्यांचे नंबर दोनचे स्थान होते. त्यांना पुन्हा एकदा महत्वाची जबाबदारी मिळेल. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री, निर्मला सीतारमन संरक्षण मंत्री आणि अरुण जेटली आजारी असताना पियुष गोएल यांन अर्थमंत्रालयाचे कामकाज सुद्धा संभाळले आहे. प्रकृतीच्य कारणास्तव आपल्याला मंत्रिमंडळात सहभागी करु नका असे अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कळवले आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयासारखे महत्वाचे खाते कोणाला मिळणार याची उत्सुक्ता आहे.