पुढील वर्षी देशात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानं देखील सत्ता राखण्यासोबतच मोठा विजय मिळवण्याचा दावा केला आहे. त्यानुसार योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच भाजपानं आपली धोरणं आखायला सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीचं तोंडभरून कौतुक केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे इथल्या जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, गेल्या ४.५ वर्षांपासून सरकारी बुलडोझरने अतिक्रमण माफियांची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली आहेत”, असं पंतप्रधान म्हणाले. तसेच, “योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारने उत्तर प्रदेशात विकासकामांवर दिलेला भर पाहून आता लोक देखील ‘यूपी प्लस योगी, बहुत है उपयोगी’, असं म्हणू लागले आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

“कॅमेरे होते, म्हणून तुम्हाला ते दिसलं”

“योगीजी म्हणत होते की काशीमध्ये मोदींनी शिवजींची पूजा केली आणि तिथून निघताच श्रमिकांची पूजा केली. पुष्पवर्षा करून श्रमिकांचं अभिवंदन केलं. मित्रांनो, कॅमेरावाले होते, म्हणून तुम्हाला ते दिसलं. पण आमचं सरकार दिवस-रात्र गरीबांसाठीच काम करतं. आमच्या सरकारने उत्तर प्रदेशात ३० लाखांपेक्षा जास्त गरीबांना पक्की घरं बांधून दिली आहेत”, असं पंतप्रधान म्हणाले.

“आधी मोठे प्रकल्प फक्त कागदावर सुरू व्हायचे”

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील पूर्वीच्या सरकारवर देखील टीका केली. “सध्या उत्तर प्रदेशमध्ये येत असलेल्या अत्याधुनिक सोयी-सुविधा हेच दाखवत आहेत की जनतेचा पैसा कसा वापरला गेला आहे. तुम्ही पाहिलंय की आधी जनतेचा पैसा कसा वापरला जायचा. पण आज उत्तर प्रदेशमधला पैसा उत्तर प्रदेशच्या विकासासाठी वापरला जातो. आधी मोठे प्रकल्प फक्त कागदावरच सुरू व्हायचे”, अशा शब्दांत मोदींनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi praised yogi adityanath in uttar pradesh rally longest express way pmw
First published on: 18-12-2021 at 16:48 IST