लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे फारच थोडावेळ उरला आहे, असे सूचक विधान केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी शुक्रवारी केले. त्यामुळे ‘आप’ला मुख्यमंत्रीपदासंदर्भात नजिकच्या भविष्यात निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता दिसू लागली आहे.

MLA Nilesh Lanke resign
निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”
electoral bonds and supreme court
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी सरकारने १० हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली
rahul gandhi bharat jodo nyay yatra will end with rally at shivaji park in mumbai
“भाजपाचं सरकार गेलं की बघून घेऊ”, १७०० कोटींच्या नोटीशीनंतर राहुल गांधींचा सीबीआय, ईडीला इशारा
Supreme court Justince Bhushan Gavai
“सरकार आणि कार्यकारी मंडळ अपयशी ठरत असताना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मोठे विधान

कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणी केजरीवाल ‘ईडी’च्या कोठडीत असून तुरुंगात राहून ते दिल्लीचे सरकार चालवत आहेत. ते तुरुंगात राहिले तरी केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील अशी ‘आप’ची अधिकृत भूमिका असली तरी, केजरीवालांचे संदेश मात्र त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल दिल्लीकरांपर्यंत पोहोचवत आहेत. केजरीवाल आणि दिल्लीकर जनता यांच्यातील दुवा म्हणून ‘आप’चे नेते नव्हे तर सुनीता केजरीवाल सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे वेळ पडली तर केजरीवाल सुनीता केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करू शकतील असे मानले जात आहे.

हेही वाचा >>>“भाजपाचं सरकार गेलं की बघून घेऊ”, १७०० कोटींच्या नोटीशीनंतर राहुल गांधींचा सीबीआय, ईडीला इशारा

केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर सुनीता यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेतली होती. केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात त्यांनी ठोस भूमिका घेत भाजपवर टीका केली होती. शुक्रवारीही सुनीता यांनी ‘एक्स’वरून जनतेला उद्देशून चित्रफीत प्रसारित केली असून केजरीवाल यांच्यासाठी संदेश पाठवून त्यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहिमेची घोषणा करत सुनीता यांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही दिला आहे. सुनीता केजरीवाल माजी भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी असून त्यांनी २२ वर्षे प्राप्तिकर विभागात काम केले आहे. भोपाळमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान तिची अरविंद केजरीवाल यांच्याशी भेट झाली.