गेल्या महिन्याभरापासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने विकलेल्या आणि त्यानंतर राजकीय पक्षांनी वटवलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आला. त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने हा तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या तपशीलांनुसार गेल्या पाच वर्षांत देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत, त्यापैकी तब्बल ५० टक्के निवडणूक रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत. त्यातलेही बहुतांश रोखे २०१९ च्या निवडणुकीच्या काळात वटवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीवर टीका करू लागले आहेत. या टीकेला भाजपामधील काही नेत्यांनी उत्तर दिलं तर काहींनी मौन बाळगलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांत यावर काही बोलले नव्हते. मात्र मोदी यांनी अखेर यावर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांवरून टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले, “जे लोक याचा विरोध करतायत किंवा यावरून गोंधळ घालतायत त्यांना एक दिवस पश्चाताप होईल.” निवडणूक रुोख्यांच्या प्रकरणामुळे आपल्या सरकारला धक्का बसण्याचा विरोधकांचा आणि माध्यमांचा दावा फेटाळून लावत मोदी म्हणाले, “कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. त्यात त्रुटी असू शकतात आणि त्या दूरही केल्या जाऊ शकतात. परंतु, त्यावरून देशभर गदारोळ माजवणाऱ्यांना एक दिवस पश्चाताप होईल.” थंती टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.

uddhav thackeray pm narendra modi (7)
“CSR फंडातही भाजपानं हात मारला, हा आकडा १,१४,४७० कोटी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप!
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४ पर्यंत देशातील परिस्थिती गंभीर होती. कारण राजकीय पक्षांना निधी कोण देतंय? त्यांच्याकडे इतके पैसे कुठून येताहेत? याबाबत लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती. परंतु, निवडणूक रोख्यांमुळे देशातील जनतेला राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबतची इत्यंभूत माहिती मिळत आहे. पैसे कुठून आले, कोणाला मिळाले अशा प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. मला असं वाटतं की, कुठलीही व्यवस्था सुरुवातीच्या टप्प्यात परिपूर्ण नसते. परंतु, त्यातल्या त्रुटी दूर करता येतात आणि त्यानंतर ती व्यवस्था परिपूर्ण करता येते.

हे ही वाचा >> “CSR फंडातही भाजपानं हात मारला, हा आकडा १,१४,४७० कोटी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप!

भाजपाला सर्वाधिक निवडणूक रोखे

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या काळात एसबीआयनं तब्बल २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांची विक्री केली. त्यातील सर्वाधिक म्हणजेच ८ हजार ६३३ निवडणूक रोखे (४६.७४%) एकट्या भाजपाच्या नावे देण्यात आले आहेत. तसेच, गेल्या पाच वर्षांत एकूण १२ हजार ७६९ कोटींचे निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत. त्यातील निम्म्याहून जास्त, म्हणजेच ६ हजार ०६० कोटींचे रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत.