PM Narendra Modi tops list of Democratic Leader Approval Ratings : पंतप्रधआन नरेंद्र मोदी हे पुन्हा जगातील सर्वात प्रसिद्ध नेते ठरले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक यादीत ‘डेमोक्रॅटिक लीडर अप्रुव्हल रेटिंग्ज’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ७५ टक्के अप्रुव्हल स्कोरसह अव्वल स्थान पटकावले आहे. अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजेंस फर्म मॉर्निंग कन्सल्टने ही आकडेवारी जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांनी ५९ टक्के अप्रुव्हल स्कोअरसह दुसरे स्थान पटकावले आहे.
विशेष बाब म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या यादीत पहिल्या पाचमध्ये देखील नाहीत. ट्रम्प यांना ४५ टक्के अप्रुव्हलसह आठवे स्थान मिळाले आहे.
नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेली ‘ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटींग’ ४ ते १० जुलै २०२५ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. सर्वेक्षण घेतलेल्या वेगवेगळ्या देशांमधील पौढ व्यक्तींनी दिलेल्या मतांची सात दिवसांची सरासरी मॉर्निंग कन्सल्टने वापरली असल्याचे म्हटले आहे.
मॉर्निंग कन्सल्ट ही अमेरिकेतील बिझनेस इंटेलिजन्स अँड डेटा अनालिटिक्स कंपनी आहे. जागतिक नेत्यांची विशेषतः लोकशाही असलेल्या देशांमधील, पब्लिक अप्रुव्हल रेटिंग या कंपनीकडून मोजली जाते. वेगवेगळ्या देशांमधील हजारो लोकांच्या दैनंदिन मुलाखतींच्या मा्यमातून ही रेटिंग दिली जाते.
या सर्वेमध्ये आढळून आले की, सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक चार पैकी तीन लोक हे मोदी डेमोक्रॅटिक नेते असल्याबद्दल सकारात्मक होते. तर १८ टक्के लोकांचा गटाची तशी भावना नव्हती, तर ७ टक्के लोकांचे मत स्पष्ट नव्हते किंवा त्यांना याबद्दल खात्री नव्हती.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय डेमोक्रॅटिक नेते ठरले आहेत. दरम्यान सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५९ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली. २९ टक्के लोकांनी त्यांचे नेतृत्व नाकारले, तर सुमारे १३ टक्के लोकांना त्यांच्याबद्दल खात्री नव्हती. या यादीत त्यांना दुसरे स्थान मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण राष्ट्राध्यक्ष पदाव येऊन त्यांना फक्त एक महिना झाला आहे.
ट्रम्प यांचा आठवा क्रमांक
गेल्या वर्षी विजय मिळवून अमेरिकेत सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना या यादीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. फक्त ४४ टक्के लोकांनी त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. तज्ज्ञांच्या मते त्यांची धोरणे जसे की ट्रेड टॅरिफ आणि अंतर्गत निर्णय यामुळे त्यांच्या लोकप्रियेतेला तडा गेला असू शकतो.
टॉप पाच जागतीक नेते
१) नरेंद्र मोदी (भारत) – ७५ टक्के अप्रुव्हल
२) ली जे-म्युंग (दक्षिण कोरिया) – ५९ टक्के अप्रुव्हल
३) जेवियर मिलेई (अर्जेंटिना) – ५७ टक्के अप्रुव्हल
४) मार्क कार्नी (कॅनडा) – ५६ टक्के अप्रुव्हल
५) अँथनी अल्बानिज (ऑस्ट्रेलिया) – ५४ टक्के अप्रुव्हल