योगगुरु बाबा रामदेव आणि IMAच्या वादावर पंतप्रधानांचे डॉक्टरांना योगावर अभ्यास करण्याचे आवाहन

“तुम्ही योगाचा अभ्यास केल्यास, जग ते अधिक गंभीरपणे घेईल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे

PM Modi on National Doctors Day, PM Modi to address Doctors
पंतप्रधानांनी करोनाच्या नियमांच पालन करण्याचे आवाहन यावेळी केले (फोटो ANI)

अ‍ॅलोपॅथीवर योगगुरु रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद मिटला नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी डॉक्टरांना अभ्यासाद्वारे योगास जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन केले. आयएमएतर्फे आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात डॉक्टर दिनानिमित्त संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कोविड -१९  साथीच्या आजारात डॉक्टरांच्या अथक सेवा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला योगाच्या फायद्यांविषयी संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा डॉक्टर योगाचा अभ्यास करतात तेव्हा संपूर्ण जग त्याला गांभीर्याने घेते. आयएमएद्वारे असा अभ्यास एका मिशन मोडमध्ये पुढे जाऊ शकते? आपला योगावरील अभ्यास आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केला जाऊ शकतो का? असे मोदींनी म्हटले आहे.

रामदेव बाबा विरुद्ध अ‍ॅलोपॅथी डॉक्टर प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात

“आज आमच्या डॉक्टरांकडून कोविड संदर्भात नियम तयार केले जात आहे आणि ते लागू करण्यात येत आहेत. वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे कसे दुर्लक्ष केले गेले हे आपण पाहिले आहे. तरीही, सर्व त्रासानंतरही भारताची स्थिती बर्‍याच विकसित देशांपेक्षा स्थिर आणि चांगली आहे” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

“मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की संपूर्ण जागरूकतेने करोना नियमांचे पालन करा. आजकाल वैद्यकीय जगाशी संबंधित लोक योगाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येत आहेत. बर्‍याच आधुनिक वैद्यकीय विज्ञान संस्था करोनाचा संसर्ग झाल्यावर योगासून कसे बरे होऊ शकतात याचा अभ्यास करत आहेत,” असे पंतप्रधानांनी म्हटले. यावेळी डॉक्टरांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आमच्या डॉक्टरांच्या ज्ञान आणि अनुभवामुळेच आम्ही करोना विषाणूविरूद्ध लढण्यात मदत मिळत आहे. आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पही सरकारने दुप्पट केला आहे.”

मूळ तपशील सादर करण्याचे बाबा रामदेव यांना निर्देश

“आज जेव्हा देश करोनाविरूद्ध लढाई लढत आहे, तेव्हा डॉक्टरांनी रात्रंदिवस कष्ट करून लाखो लोकांचे प्राण वाचवले. हे पुण्याचे कार्य करत देशातील अनेक डॉक्टरांनी आपले प्राण गमावले. ज्या डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांना मी विनम्र श्रद्धांजली वाहतो. डॉ. सी. रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा हा दिवस आमच्या आमच्या डॉक्टरांच्या आणि आरोग्य सुविधेच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहे. विशेषत: गेल्या १.५ वर्षात आपल्या डॉक्टरांनी देशवासियांची जशी सेवा केली हे त्याचे उदाहरण आहे. आमच्या सरकारने डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी गेल्या वर्षीच कायद्यात अनेक कठोर तरतुदी केल्या आहेत. यासह, आम्ही आमच्या कोविड वॉरियर्ससाठी एक विनामूल्य विमा संरक्षण योजना देखील घेऊन आलो आहोत” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm urges doctors to study yoga on while addressing the doctor day at the event abn