कुणाला करोना होतो आणि बराही होऊन जातो तरी कळत नाही, तर दुसरीकडे असे लाखो लोक आहेत ज्यांना याच करोनाच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे करोनाच्या विषाणूचा धोका ओळखणं वैज्ञानिकांसमोरील मोठं आव्हान आहे. अशातच पॉलिश वैज्ञानिकांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. या वैज्ञानिकांना करोना विषाणूचा धोका ठरवणारा जीन शोधण्यात यश आलंय. यामुळे कोणत्या लोकांना करोनाचा अधिक धोका आहे हे ओळखणं शक्य होणार आहे.

सध्या करोना विरोधी लसीकरणावर जगभरात भर दिला जातोय. मात्र, दुसरीकडे करोना लस घेण्यास तयार नसणाऱ्यांचं प्रमाण देखील नोंद घेण्यालायक आहे. त्यामुळेच करोना लस घेतल्यानंतर मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकारकशक्तीशिवाय लस न घेणाऱ्यांचा टीकाव लागणार का? त्यातील कुणाला करोनाचा सर्वाधिक धोका आहे आणि कोण करोना संसर्गाच्या साखळीला आणखी पुढे नेईल असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. हे उत्तरं शोधण्यासाठी पॉलीश वैज्ञानिकांचं संशोधन उपयोगी पडेल, अशी आशा जाणकार व्यक्त करत आहेत.

“डॉक्टरांना करोना विषाणूचा धोका कुणाला अधिक हे ओळखता येणार”

विशेष म्हणजे डॉक्टरांना कुणाला करोना विषाणूचा धोका अधिक आहे हे ओळखता आलं तर अशा नागरिकांना प्राधान्याने लसीकरणापासून इतर उपचारांची व्यवस्था करता येईल. यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील कमी करता येणार आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पॉलिश आरोग्य मंत्री अॅडम नाईदझिल्स्की म्हणाले, “मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या संशोधनामुळे करोनाच्या संसर्गाची धोका पातळी ठरवणाऱ्या जीनचा शोध लागला आहे. यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्या व्यक्तीला करोना संसर्गाचा अधिक धोका होईल हे आधीच शोधता येईल.”

हेही वाचा : “माळा काढणाऱ्यांसाठीच करोनाची तिसरी लाट”, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर डॉ. दाभोलकर म्हणाले, “वारकरी संप्रदायाच्या नावावर…”

वय, वजन, लिंगानंतर हा जीन करोनाचा धोका ठरवणारा चौथा महत्त्वाचा घटक ठरल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. पॉलिश लोकांमध्ये १४ टक्के, संपूर्ण युरोपमध्ये ८-९ टक्के आणि भारतात २७ टक्के लोकांमध्ये हा जीन आढळल्याचंही संशोधकांनी नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.