Pune Porsche Crash Latest Updates : पुण्यात पोर्श ही कोट्यवधी किंमतीची कार बेदरकारपणे चालवून बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोन जणांना उडवलं. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा कोट्यवधींची पोर्श गाडी चालवत होता. रविवारी ही घटना घडली आहे. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. अनिश आणि अश्विनी या दोघांची काहीही चूक नसताना फक्त एका विख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत त्या दोघांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. यानंतर आता अनिशच्या आईची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकी काय घटना घडली?

मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अनिश आणि अश्विनी यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर त्याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी पोलीस आम्हाला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. तर अनिशच्या आईने माझा मुलगा माझ्यापासून हिरावून का नेला असा प्रश्न विचारत हंबरडा फोडला आहे.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला

Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”

अनिशच्या आईने काय म्हटलं आहे?

“माझा मुलगा अनिश तीन वर्षांपासून पुण्यात होता. तो अतिशय गुणी होता. आमच्यापासून दूर असला तरी आमची काळजी घ्यायचा. रविवारी पहाटे ३ वाजता मला त्याच्या मित्रांचा फोन आला. त्याचे मित्र म्हणाले, काकू अनिशच्या बाबांना फोन द्या आम्हाला त्यांच्यशी बोलायचे आहे. अनिशचा अपघात झाला तो सिरिअस आहे. लवकर या… आम्ही इतक्या दूर होतो लवकर कसं जाणार … त्यानंतर काही वेळातच अनिशच्या मृत्यूची बातमी आली, आमच्या पायांखालची जमीनच सरकली. अनिश माझ्यासाठी, त्याच्या लहान भावासाठी पूर्ण कुटुंबासाठी आधारस्तंभासारखा होता. त्याला का मारलं? मला माझा मुलगा परत द्या” म्हणत अनिषच्या आईने हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला.

अनिशच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

अनिशचे वडील म्हणाले, “अनिश पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. अपघाताच्या आधीच तो दुबईला जाऊन आला होता. तसंच त्याची कंपनी त्याला विदेशात पाठवणार होती. त्याचं ते स्वप्न होतं. मात्र त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. अनिशच्या ऑफिसला सुटी असल्याने पार्टीसाठी गेला होता. रात्री २ ते ३ च्या सुमारास तो पार्टीवरुन घरी परतत होता. त्याचवेळी त्याचा अपघात झाला.त्याच्या मित्रांनी त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी आम्हाला घटनेची माहिती मिळाली. अनिश विदेशात जाण्याचं स्वप्न पाहात होता. आमच्या कुटुंबाचा आधार गेला. आमच्या मुलांना त्रास झाला.”