Father Of Man Who Peed On Adivasi Worker: मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुब्री गावात एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ काल (४ जुलै) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता मजुरावर लघवी केल्याचा आरोप असलेल्या प्रवेश शुक्लाचे वडील रमाकांत शुक्ला यांनी आपला मुलगा भाजप आमदारांचा प्रतिनिधी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी व्हिडीओ संदर्भात खळबळजनक दावे केले आहेत.

मजुराच्या शरीरावर लघवी करणाऱ्या तरुणाचे वडील सांगतात की…

न्यूज २४ चॅनेलने प्रवेश शुक्ला यांचे वडील रमाकांत शुक्ला यांचा व्हिडीओ शेअर केला आहे, माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत शुक्ला म्हणतात की, “माझा मुलगा मागील ४ ते ५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय प्रतिनिधी आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमच्या कुटुंबाचे चार उमेदवार होते. त्यात आम्हाला अनपेक्षित विजय प्राप्त झाला यावरूनच आता आम्हाला टार्गेट केले जात आहे. आणि जानेवारीपासूनच असा त्रास दिला जात आहे. आता सुद्धा (प्रवेशची) पत्नी व आईला रात्री नऊ वाजता बोलवून आणलं आहे.”

“आदर्श शुक्ला, दीनदयाळ साहू, व मृत्युंजय प्रसाद गौतम नामक काही जण आपल्या गुंडांसह आमच्या घराच्या बाहेर हत्यारे घेऊन फिरायचे. सहा जूनला त्यांच्याविरुद्ध तक्रारही केली होती. आम्हाला त्रास देऊन आमच्या मुलाला अडकवण्याचा हा नकली व्हिडीओ बनवलेला आहे. आमचा मुलगा असं वागूच शकत नाही. मध्यंतरी काही दिवस आमचा मुलगा बेपत्ता सुद्धा होता त्याला अपहरण करून मारून टाकलं की काय अशीही भीती होती. आता सुद्धा त्याला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. मला आशा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि न्याय मिळेल

प्रवेश हा सिधी येथील भाजपचा कार्यकर्ता आणि केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला होता. मात्र, केदार यांनी प्रवेशशी कोणताही संबंध नाही, माझे तीन प्रतिनिधी आहेत, प्रवेश त्यापैकी एक नाही. असेही केदार यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली आहे. आरोपीनं पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघवी केली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा आहे. तो मजुरीचं काम करते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही यावर प्रतिक्रिया देत या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे सांगितले.