संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेलं Mi- 17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसंच इतर १४ वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; घटनास्थळी बचावकार्य सुरु

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ

मोदींना देण्यात आली माहिती

दिल्लीत कॅबिनेट बैठक सुरु असून यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेची माहिती दिली आहे.

दरम्यान या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना वेलिंग्टन येथील लष्कर रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

हवाई दलाकडून चौकशीचा आदेश

हवाई दलाने बिपीन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं आहे.

दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.